युवा चा अर्थ वायू या उलट्या शब्दाने युवा तयार झाले आहे वायू म्हणजे हवा ..वारा आणि वादळ निर्माण करण्याची शक्ती वायू मध्ये आहे यासाठी युवांनी मूक न राहता गतिशील राहायला हव असे मत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य धर्मनारायण शर्मा यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषद आणि धर्म जागरण तर्फे लिंगराज कॉलेज मैदानावर आयोजित विराट हिंदू सभेत धर्म नारायण शर्मा बोलत होते.विराट हिंदू सभेच्या अध्यक्षस्थानी चित्रदुर्गचे बसवमूर्ती मादार चन्नया महास्वामी होते. व्यासपीठावर विविध मठाच्या दीडशेहून अधिक मठाधीश आणि स्वामीजींनी उपस्थिती दर्शवली होती. सायंकाळी संभाजी चौकातून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली यावेळी वातावरण भगवंमय झाल होत.
भारत माता संकटात आहे रावळपिंडी लाहोर ही शहर कुठे आहेत? शेजारी शत्रू देशावर कायम युद्धासाठी डिवचत आहेत अश्या स्थितीत आमच्या समोर ध्येय पाहिजे देशाची सुरक्षा महत्वाची आहे अस देखील शर्मा म्हणाले. पूर्वी नालंदा तक्षशीला सारख्या जगाला शिक्षण प्रदान करणाऱ्या संस्था देशात होत्या आज ते कमतरता आहे यासाठी सनातन धर्माचा प्रसार चारी दिशांना करा अस आवाहन देखील त्यांनी केल.
ब्रिटिशांना आपला देश तोडणे शक्य झाले नाही.पण ब्रिटिश गेल्यावर सत्तर वर्षांनी आपले लोकच हे कृत्य करत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे.बाहेरच्यांना बोलवून त्यांना पैसे देऊन अशी कृत्ये केली जात आहेत.अत्यंत नियोजनपूर्वक समाजात फूट पाडविण्याचे काम सुरु आहे, सिद्धगिरी मठाचे पिठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले.
सगळ्या भारतीयांनी एकत्र राहायला पाहिजे.दलित कुटुंबे धर्मांतर करत आहेत.त्याविषयी आपण आत्मचिंतन केले पाहिजे.धर्मांतराची कारणे शोधली पाहिजेत.अस्पृश्याना समाजात दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे धर्मांतर होत आहेत,अशी खंत विराट हिंदू सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बसवमूर्ती मादार चन्नया महास्वामी यांनी व्यक्त केली.विराट हिंदू सभेत अनेक स्वामीजींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.विराट हिंदू सभेला जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.