शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचे विधिवत पूजन दादाराजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते रविवारी सकाळी करण्यात आले . देशातील गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने देशातील १२३ किल्ल्यांचे पूजन शिवाजी ट्रेल या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे . या १२३ किल्ल्यामध्ये बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचा समावेश असून त्याच्या पूजनाचा मान निपाणीकर सरकारांच्याकडे आहे .
सकाळी भुईकोट किल्ला येथे निपाणीकर सरकार ,त्यांचे भालदार ,चोपदार आणि कार्यकर्त्यांसह आगमन झाले . या प्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे किरण गावडे आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले . दुर्गादेवीची आरती केल्यावर ध्वज पूजन निपाणीकर सरकारांच्या हस्ते करण्यात आले . किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी विधिवत दुर्गापूजन दादाराजे निपाणीकर यांनी केले . दुर्गापूजनाचे पौरोहित्य लष्कराच्या दुर्गादेवी मंदिराच्या पंडितांनी केले .
देशातील गड किल्ल्यांचे संवर्धन आणि संरक्षण केंद्र आणि राज्य सरकारने करावे . किल्ल्यांचे संवर्धन केले तरच भावी पिढीला आपला इतिहास समजेल असे विचार दादाराजे निप्पाणीकर सरकारानी दुर्गपुजन प्रसंगी बोलताना व्यक्त केले .याप्रसंगी रमेश रायजादे, विश्वनाथ पाटील, जयराज हालगेकर,नितीन कपलेश्वरी सुनील जाधव, दिलीप रायजादे, विजय बोगाळे ,योगेश घाटगे, जयवंत साळुंखे, विशाल पाटील, सागर मुतकेकर, अभिजित अष्टेकर, यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते