Sunday, September 8, 2024

/

एकीसाठी पाईकांची तर पवार दौऱ्यावर मध्यवर्ती ची बैठक

 belgaum

समितीच्या युवकांनी जी एकीची चळवळ उभी केली आहे त्यान्वये आपण समितीतील एकीसाठी सामितीला 25 तारखे पर्यंत आपली एकीची भूमिका स्पष्ट करावी असा ठराव केला होता. त्यानंतर सर्व नेत्यांना निवेदने देण्यात आली देत आहोत. सर्वांचे काही मतभेद असले तरीही एकीसाठी  सगळे सकारात्मक आहेत तर आजपर्यंत आपल्या कार्याचा लेखाजोखा आणि यापुढील प्रयत्नांची दिशा ठरविण्यासाठी *सर्व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक रविवार तारीख 25/2/2018 रोजी सायंकाळी 4.30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे आयोजित केली* आहे.

सदर बैठकीला *सर्व पंच मंडळ, वकील संघटना व्यापारी संघटना .संस्था , व्यापारी वर्ग, जेष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक* जे एकीत सहकार्य करू शकतील त्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करावे  असे कळवण्यात आले आहे.

मध्यवर्ती समितीचीच्या सदस्यांची बैठक आज सायंकाळी पाच वाजता रंगुबाई पॅलेस मध्ये आयोजित केली आहे  31 मार्च रोजी शरद पवार यांच्या बेळगाव दौऱ्यात नियोजन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.