आगामी २५ फेब्रुवारी रोजी शहरातील लिंगराज कॉलेज मैदानावर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विराट हिंदू सभेचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती तीन राज्याचे क्षेत्रीय प्रमुख केशव हेगडे यांनी दिलीबेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . अध्यात्मात देवस्थान आणि मठांची भूमिका महत्वाची आहे यासाठी साधू संत आणि महात्मे सत्व पुरुषांनी कार्ये केली आहेत. हिंदू समाजाच्या रक्षणासाठी संघटीत होणे गरजेचे असून सामुहिक आंदोलन करणे देखील गरजेचे आहे.
कणेरी श्री सिद्धगिरी संस्थानांचे काडसिद्धेश्वर महा स्वामीजी,निडसोशीचे निरंजन जगद्गुरू ,सच्चिदानंद अभिनव स्वामीजी,विद्या नरसिंह भारती स्वामीजी,मुगळखोड मरुग राघवेंद्र स्वामीजी,वरूर च धर्मसेन भट्टारक स्वामीजी, असे १५० अहून अधिक स्वामीजी या हिंदू सभेत सहभागी होणार आहेतविश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सदस्य धर्म नारायण शर्मा याचं मुख्य भाषण असणार आहे डॉ सिद्धराम स्वामीजी या सभेच्या अध्यक्ष स्थानी असणार आहेत. यावेळी राजू चिक्कणगौडर प्रभू हुगार वकील ए जी मुळवाडमठ,कृष्ण भट्ट,लक्ष्मण पवार बाळन्ना कग्ग्नगी आदी उपस्थित होते.
Trending Now