महा पालिकेचे महापौर पदाच्या आरक्षण विरोधात कर्नाटक उच्च न्यालायायात दाखल केलेल्या याचिकेवर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. महापौर पॅड अनुसूचित जमाती तर उपमहापौर महिला अ साठी आरक्षित करण्यात आले आहे.
पालिकेतील नगरसेवक वकील रतन मासेकर यांनी पालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती त्यानुसार नगरविकास खाते ,पालिका आयुक्त,प्रादेशिक आयुक्त यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. बुधवारी झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी व याचिका कर्त्यांच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली पुन्हा सुनावणी शुक्रवारी पुढे ढकलण्यात आली आहे. शुक्रवारी सरकारी वकील आरक्षणा बाबत खुलासा करणार आहेत त्यांनतर यावर निर्णय घेतला जाणार आहे.