उत्तरचे आमदार फिरोज सेठ याचं बुडा अध्यक्षपद बेकायदेशीर आहे असा आरोप भाजपचे अड अनिल बेनके यांनी केला आहे बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सेठ यांना घटनेच्या १९१/१,१६१/१,अनुसार लाभाचे पद स्वीकारण्याची संधी नाही घटनेतील तरतुदी नुसार आमदार आणि खासदार लाभाचे पद भूषवू शकत नाहीत लाभाचे पद स्वीकारताच कायद्यानुसार ताबड्तोबड त्यांचे आमदार पद रद्द होतय असा न्यायालयाचा आदेश आहे अस देखील बेनके म्हणाले.
आमदार फिरोज सेठ यांना राज्य सरकार आमदारकी असताना लाभाच पद कस काय देऊ शकत असा सवाल देखील बेनेके यांनी यावेळी उपस्थित केला आहे.आगामी दोन चार दिवसात सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करू अशी माहिती बेनेके यांनी दिली आहे.
क्रिकेट सामान्यांना का परवानगी नाही?
सातव्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेस सरदार मैदानात शासनाकडून का परवानगी दिली जात नाही असा देखील प्रश्न बेनके यांनी उपस्थित केला आहे. आमच्या ५ व्या ते सातव्या स्पर्धांना का परवानगी दिली गेली नाही सरदार हे मैदान क्रिकेट खेळासाठी राखीव असताना या मैदानावार इतर कार्यक्रमाना परवानगी दिली जाते मात्र आमच्या क्रिकेट स्पर्धांना का डावलल जातंय अशी देखील भूमिका त्यांनी मांडली. १कोटीच्या अनुदानातून मैदानाचे निर्माण केले जात आहे मात्र प्रत्यक्षात २५ लाखाचे काम देखील मैदानावर दिसत नाही आहे याच्या तपासासाठी केस दाखल केली असल्याचे देखील ते म्हणाले.