आगामी विधान सभा निवडणूक आणि सुप्रीम कोर्टातील सीमा प्रश्नाची सध्य परिस्थिती वर सीमा लढ्याला चालना मिळण्यासाठी आगामी ३१ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता बेळगावात राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची जाहीर सभा मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर ‘एक सीमावासीय लाख सीमावासीय’यशस्वी करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी उपस्थित होते मराठा मंदिराच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी ही बैठक पार पडली. मेजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट आम्ही घेतली त्यावेळी एकीकरण समितीच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी येणार असल्याचे सांगितले आहे ३१ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत शहरातील सी पी एड किंवा मराठी विद्या निकेतन शाळेच्या मैदानावर सभा घेऊ यावेळी सीमा लढ्यात योगदान दिलेल्या अड राम आपटे आणि अड किसनराव येळ्ळूरकर यांचा सत्कार करू अस मध्यवर्ती अध्यक्ष दळवी म्हणाले.
कर्नाटकात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असून एकीकरण समितीच्या विरोधात निवडणूक लढवणार नसल्याचे पवार यांनी समिती नेत्यांना भेटीत आश्वासन दिले असल्याचे देखील दळवी म्हणाले. बेळगावात पवार यांच्या सभेने पुन्हा एकदा सीमा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर जाईल कर्नाटक सरकारला देखील वेगळा मेसेज जाईल यासाठी पवार यांच्या जाहीर सभेस एक लाख मराठी भाषिक जमवुया गावोगावी प्रचार सभा बैठका घायला सुरुवात करा घटक समित्यांनी देखील या कामी जनजागृती कामे करावे असे आवाहन मध्यवर्ती कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले. दर रविवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी बैठक घेण्याचे देखील ठरवण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम यांचा जाहीर निषेध ठराव देखील बैठकीत मांडण्यात आला. बडोदा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात सीमा प्रश्नाचा ठराव न मांडल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. समितीच्या नेक दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.