पाच राज्यांना जोडणारी म्हैसूरू उदयपूर पहिल्या हमसफर एक्सप्रेस चे सिटीजन कौन्सिलच्या वतीनं बेळगाव रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आलं.सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूरू मध्ये या एक्सप्रेसचं उदघाटन केलं होतं.
आगामी १ मार्च पासून आठवड्यातून एकदा पूर्ण ए सी १८ डब्यांची ही ट्रेन सुरू असणार आहे. महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान अश्या पाच राज्यातून ही गाडी जाणार आहे.बेळगाव हुन पुणे गुजरात राजस्थानला जाणाऱ्या प्रवाश्यांना हा गाडीचा लाभ होणार आहे.एक मार्च पासून दर गुरुवारी म्हैसूरू हुन सकाळी १0 वाजता निघणार असून रात्री ११:१५वाजता बेळगावला पोहोचेल तर शनिवारी पहाटे पाच वाजता उदयपूरला पोहोचेल.
आज मंगळवारी सकाळी उदघाटीत खास ट्रेन चे स्वागत सिटीजन कौन्सिलच्या वतीन करण्यात आलं यावेळी स्टेशन मास्टर एस सुरेश सह इतरांना मिठाई वितरित करण्यात आली.सध्या ही गाडी आठवड्यातुन एकदा असलेली आठवड्या तुन दोनदा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील या गाडीचा वेग ताशी ५२ हुन ५५ किमी करण्यासाठी प्रयत्न करू असे सिटीजन कौन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर म्हणाले.यावेळी सिटीजन कौन्सिल चे सेवंतीलाल शाह,विकास कलघटगी,अरुण कुलकर्णी, बसवराज जवळी,मारवाडी समाजाचे विक्रम पुरोहित,विजय भद्रा,चंदन पुरोहित,संतोष शर्माआदी उपस्थित होते.
मराठी लोको पायलटचं देखील स्वागत
शुभारंभ स्पेशल गाडी चालवणाचा मान मिळवणाऱ्या मराठी माणूस ए आर बगडे यांचा सतीश तेंडुलकर यांनी सत्कार केला. बगडे यांनी पाच राज्यातून जाणाऱ्या या ए सी ट्रेनला मोदी यांनी माझ्या समोर हिरवा झेंडा दाखवला मी ती सर्वप्रथम चालवली याचा अभिमान वाटत असल्याचे मनोगत बेळगाव live कडे बोलताना व्यक्त केले.