सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंती कार्यक्रम सरकारी अधिकारी ,लोकप्रतिनिधी आणि त्यांचे निवडक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला. एरव्ही मराठीची कावीळ असलेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्या समोर शिवाजी उद्यानातील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर प्रेरणा मंत्र आणि ध्येय मंत्र गरजले. शुभांगी दिवटे हिने ध्येय मंत्र म्हणत शिवरायांचा जयघोष केला.
सकाळी शिवाजी उद्यान येथे महापौर संज्योत बांदेकर उपमहापौर नागेश मंडोळकर,पालिका आयुक्त शशिधर कुरेर ,ए डी सी सुरेश ईटनाळ, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले .नंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत बाहेरून आणण्यात आलेली भाडोत्री कला पथके सहभागी झाली होती .बेळगावातील शिव जयंती मिरवणुकीत लोकांचा सहभाग असतो उत्साह असतो मात्र या कार्यक्रमाकडे जनतेने पाठ फिरवली होती केवळ शासकीय अधिकारी मोजके लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते .
काँग्रेस नेते राजेश जाधव यांनी यावेळी आजी माजी महापौर उपमहापौरांसह शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार केला.