सोमवारी बेळगाव महापालिकेच्या वतीनं तारखेनुसार साजरी करण्यात येणाऱ्या शिव जयंतीतील फलकात मराठीची कावीळ दिसत आहे.
सोमवारी सकाळी शिवाजी उद्यानात शासकीय शिवजयंती साजरी करण्यासाठी रविवारीच मंच उभारण्यात आला असून त्यावर फक्त कन्नड भाषेत फलक लावण्यात आला आहे.
पालिकेत मराठी भाषिक महापौर आहे मराठी भाषिकांची सत्ता आहे आणि तब्बल 32 मराठी नगरसेवकांची संख्या असून देखील फलक केवळ कन्नड भाषेत लावण्यात आले आहेत.
आगामी निवडणुकात मराठी भाषिकांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासकीय पातळी वर जोरात करण्याचा आव आणण्यात आला आहे, पण मराठी भाषेला डावलून मराठी भाषिक कसे खुश होणार? याचे भान प्रशासनाला नाही.
एकीकडे मनपा यंत्रणेने ही तयारी केली आहे तर दुसरीकडे मनपातील महापौर, उपमहापौर तसेच गटनेते आणि मराठी नगरसेवक महापौर चषकात गुंतलेले होते. गटनेत्यांच्या वाढदिवसाला अचानक चषक ठेऊन नगरसेवक गुंतले असताना शिवाजी उद्यानात मराठी डावलण्यात आल्याचे भान त्यांना नाही. आता उद्या पूर्ण कन्नड मंचावर महापौर जाऊन बसणार का? हे बघावे लागेल.