Saturday, December 28, 2024

/

साहित्य संमेलनात अवतरला सीमाभागातील ‘लढा ‘ …. ! – कवी राजन लाखे

 belgaum

Badodaअखिल भारतीय साहित्य संमेलन बडोदा गुजरात येथे कवीकट्टा काव्य मंचावर कुद्रेमानी बेळगांव येथील कवी रवि पाटील यांनी सीमाप्रश्नावरील वास्तवातील व्यथा , वेदना मांडणारी ‘ लढा ‘
कविता सादर केली .
यावेळी कवी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी राजन लाखे होते .

राजन लाखे म्हणाले ,
आपली बोली, आपला बाणा घेवून या सीमा बांधवानी मराठीचा या साहित्य संमेलन ‘लढा ‘ अवतरला जसा … …

” मराठी, मराठी ,मराठी
तो धर्म माझा मराठी
दरवळतो दाही दिशा
तो गंध आपला बाणा ”

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कवी राजन लाखे , सयाजीराव गायकवाड विद्यापिठाचे मराठी विभाग प्रमुख संजय करंदीकर , सौ . निता शहा , चंद्रकांत धाडणकर व चैत्राली जोगळेकर, कवी जयवंत जाधव, साहित्यीक बाळासाहेब तोरसकर व कवी कट्टा मंच वर काव्य सादर करण्यासाठी महाराष्ट्रातून कवींची हजरी होती .

या वेळी कवी रवी पाटील यांनी ६३ वर्ष हा सीमाप्रश्न भिजत पडला आहे . सुरवातीला अखंड संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या चरणी अर्पण करून .ही ‘लढा ‘ कवीता सादरीकरताना ….
” सीमालढा हा सीमालढा
कुणी निर्मिला हा कोंडवाडा
अखंड महाराष्ट्राचा लढा
भिजत पडला का तिढा ..?

ही खंत करून , प्रशासनाचा भडगा उगारून अनेक प्रकारे दंडूकेशाही ने मराठी संस्कृती दाबून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून…
” पहा वळूनी स्वराज्याकडे
सहयाद्रीचे उंचकडे
तसचे मराठे ध्येयवेडे
का कर नाटकी रडे… ?
शेवटी त्यांनी हा लढा म्हणजे मराठीचा अस्मितेचा, संस्कृतीचा व भगव्याचा लढा व्यक्त करतांना रसिक श्रोत्यांची वा… वा … घेत
टाळ्यांनी मनमुराद दाद दिली .

1 COMMENT

  1. मला अभिमान आहे माझ्या गावचा सुपुत्र बदोडा येथे मराठी साहित्य संमेलनामध्ये सीमालढ्यावरती कविता सादर करतो
    राजेंद्र अशोक पाटील व परीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.