निवडणूक तोंडावर असताना महिलांना चांगलीच पर्वणी मिळत असून ग्रामीण भागात साड्या नंतर कुकर देखील वाटप करण्यात येत आहे. अजून निवडणूक मतदान तीन महिने लांब असताना मतदारांना आकर्षित करण्याचे प्रकार बेळगाव ग्रामीण मतदार संघात जोरात सुरु आहेत.या प्रकारात आमिष मिळते म्हणून वाहवत जाणाऱ्या लोकांना तुमची ऐपत नाही काय असा सवाल केला आहे तरुणांनी…….
गेले कित्येक महिने राष्ट्रीय पक्षाच्या महिला नेत्या कडून ग्रामीण भागात साड्या वाटप सुरू होता आता त्यात प्रेशर कुकर आणि इस्त्रीदेखील समाविष्ट झाली आहे.नुकतेच जवानांना बोलवून अपमान केल्याचे प्रकरण ताजे आहे.
या निमित्ताने हिंडलगा युवा आघाडीने गल्लोगल्ली जागर सुरू केला आहे. दारांवर फलक लावून तुमच्या पतीची, पित्याची किंवा भावाची एक साडी , कुकर, भांडी किंवा इस्त्री घेऊन द्यायची ऐपत नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.
साडी आणि कुकरच्या आशेने लोक असेच इच्छूकांच्या मागे पळणार की शहाणे होणार हे पाहावे लागेल.