माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी अनेकदा कर्नाटकातील हिंदू मंदिरांना भेटी दिल्या होत्या.गांधी कुटुंब कधीही कर्नाटकात आले तर ते दर्शनाला जातेच भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतलाय का असा संतप्त सवाल गृह मंत्री रामलिंग रेड्डी यांनी केला आहे.
शनिवारी सकाळी बेळगाव येथील सांबरा विमान तळावर आले असता त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते एका दिवसाच्या चिकोडी दौऱ्यावर जाण्यासाठी बेळगावला आले होते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकात सुरु केलेल्या मंदिर भेटी दिखावा असल्याची टीका कौशल्य विकास राज्य मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केली होती त्या टीकेला गृह मंत्र्यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिल आहे.
जाती धर्मात भांडण लावायची कामे बंद करून भाजपने जनहिताची कामे करावी असा सल्ला देखील रेड्डी यांनी यावेळी दिला आहे.पत्रकार गौरी लंकेश हत्त्येत एस आय टी ची नियुती केली असून साक्षीदार आणि पुरावे गोळा करूनच आरोपींना अटक करणार आहे.पानसरे दाभोळकर हत्त्येत आरोपची सबळ पुराव्या अभावी सुटका करण्यात आली होती त्यामुळे तशी चुक आम्ही करणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयाची नवीन इमारत बांधायचा निर्णय झाला आहे त्यासाठी अनुदान देखील मंजूर करण्यात आले आहे शक्य तितक्या लवकर पोलीस आयुक्त कार्यलयाच्या इमारतीचे काम सुरु होईल अस देखील ते म्हणाले.