महात्मा फुले रोडवर एक नवे हिरवे मैदान बनवले आहे. या मैदानावर कोरे गल्लीच्या मुलांनी स्वतःच एक पीच हिरवळ मैदान बनवल आहे. ३ मार्च पासून येथे क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.
मैदानाच नसल्याने शेवटी खासगी जागा निवडून मुलांनी ही खेळण्याची सोया करून घेतली आहे. झुडुपांनी भरलेल्या या जागेची स्वच्छता करण्यात आली, व काम सुरू झाले, हे काम बघून एकएक सदस्य वाढत गेला.
मैदान उंच सखल होते, त्यामुळे सपाटीकरण करून घेण्यात आले. जागा मालकानेही आपली १२ गुंठे जागा या मुलांना तात्पुरत्या स्वरूपात देऊन टाकली आहे.सध्या कोरे गल्ली स्पोर्ट क्लब या नावाने टाकाऊ जागेत मैदान उभारले गेले आहे.
या कामाला आजवर ४० हजार रुपये खर्च आला आहे. आता कर्नाटक , महाराष्ट्र आणि गोवा येथून ३२ टीम येणार असून सामने होणार आहेत अशी माहिती स्कोरे गल्ली स्पोर्ट्स क्लबचे युवराज हावळानाचे यांनी दिली आहे.