दिवसभर हेल्मेट वापरून कंटाळा आला म्हणून रात्री विनाहेल्मेट फिरण्याची सोय नाही कारण बेळगावचे पोलीस मध्यरात्रीही विनाहेल्मेटस्वारांवर कारवाई करू लागले आहेत,
काही दिवसांपूर्वी पासून हा प्रकार सुरू आहे, रात्री कुणीही विनाहेल्मेट फिरत असल्यास पोलीस त्याला हटकत असून दंड वसूल करत आहेत.
पोलीस अधिकारी आपले बळ वापरून हेल्मेट स्वारांवर कारवाई करत आहेत, हे बळ त्यांनी प्रलंबीत खून प्रकरणांच्या शोधासाठीही वापरावे अशी प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत.