येत्या सोमवारी १९ तारखेपासून म्हैसूर- उदयपूर हमसफर एक्सप्रेस च्या सफरीला सुरुवात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हैसूर येथून ही पाच राज्यांना जोडणारी रेल्वेसेवा सुरू करणार आहेत.
या रेल्वे सेवा साठीचे बुकिंग १४ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आले आहे. रेल्वे क्र १९६६७/१९६६८ ही हमसफर एक्सप्रेस आठवड्यातून एकदा सेवा देणार आहे. या रेल्वेचा बेळगावकरांना मोठा फायदा होणार आहे.
म्हैसूर येथून ही रेल्वे प्रत्येक सोमवारी निघणार असून उद यपूरला बुधवारी पोचणार आहे.
Trending Now