आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी एकीकरण समितीत’एकी’व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या समितीच्या पाईकांनी समिती नेत्यांचे उंबरे झिजवायला सुरुवात केली आहे.
मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, तालुका समितीचे मनोहर किणेकर, निंगोजी हुद्दार, तालुका समितीचे मनोज पावशे,वाय बी चौगुले,महापौर संज्योत बांदेकर गट नेते पंढरी परब,मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेऊन एकी करा असं निवेदन दिलं.
समितीच्या सर्वच नेत्यांनी एकीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून एकीच्या प्रक्रियेला नेत्यांच्या या भूमिकेने उभारी मिळाली आहे.पाईकांनी आज दिवसभर मॅरेथॉन भेटी घेऊन एकीसाठी पायपीट केली आहे.आगामी काही दिवसात समिती नेते एकत्र येतील यासाठी बेळगाव live देखील प्रयत्नशील राहील.
समिती नेत्यांनी पाईकांना दिलेलं आश्वासन खालील प्रमाणे आहे.
एकी शिवाय पर्याय नाही-मालोजी
आगामी विधान सभेत एकी शिवाय पर्याय नाही एकी करायलाच हवी असे मत मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी मांडलं.
सगळ्या कडून काय प्रतिसाद मिळतो ते पाहून ठरवू-किणेकर-
पाईकांनी सगळ्यांना निवेदन द्यावं सगळ्या कडून काय प्रतिसाद येतो ते पाहून पुढची दिशा ठरवू आम्ही एकीसाठी तयार आहोत अशी सावध प्रतिक्रिया माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.
तालुका समिती तयार-हुद्दार
अध्यक्ष या नात्यानं मी तयार आहे एकी साठी कधीही तयार आहे सर्व जण एक झाले पाहिजेत अस मत तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार यांनी मांडलं.
गटाच्या बैठकीसाठी प्रयत्नशील- महापौर
सर्व नगरसेवकांच्या पालिकेत समितीची एकी व्हावी यासाठी एक बैठक आयोजित करू आमच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून निर्णय घेऊ अस मत महापौर संज्योत बांदेकर यांनी व्यक्त केलं आहे.
कार्यकर्ते एकत्र नेत्यांत दुरावा-परब
सध्या स्थितीत कार्यकर्ते एकत्रच आहेत केवळ नेत्यांत दुरावा आहे नगरसेवकांनी स्थानिक पंच आणि कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन प्रयत्न करावेत गट नेते पंढरी परब यांनी व्यक्त केलं आहे.
दोन दिवसात एकी बाबत भूमिका-मनोज पावशे
एकीसाठी आमची कधीच माघार नाही मात्र आगामी दोन दिवसात आमची बैठक घेऊन भूमिका जाहीर करणार तालुका समिती सरचिटणीस मनोज पावशे
आम्हाला का टाळलं जातंय?- वाय बी
आमच्या गटाची उमेदवारी द्या अशी आमची मागणी नसते मात्र दोन उमेदवार झाले की सीट पडणार हे माहीत असताना देखील आम्हाला बोलवत नाहीत. आम्हाला सर्व कार्यक्रमात बोलवावं समिती म्हणून आम्ही येऊ एकीसाठी कधीही यायला तयार-तालुका समिती कार्याध्यक्ष वाय बी चौगुले यांनी भूमिका मांडली आहे.
मागणी कार्यकारणी समोर ठेऊ-दळवी
एकीची मागणी निवेदन मध्यवर्ती कार्यकारिणी समोर ठेऊ आणि चर्चा करून तुम्हाला कळवतो-मध्यवर्ती अध्यक्ष दिपक दळवी यांची भूमिका