मागच्या विधानसभे पासून गुडघ्याला बाशिंग लावून इच्छूक असणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या महिला उमेदवाराच्या वाढदिवस कार्यक्रमात देश सेवेसाठी झटलेला आणि झटणाऱ्या जवानांची क्रूर थट्टा केली गेली आहे. महिला नेत्यांने आयोजित केलेल्या मेजवानीत भेट वस्तू स्वीकारणाऱ्या सेवा निवृत्त जवानांचे हाल झाल्याची घटना घडली आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून नियोजित कार्यक्रमात अडीच हजार हुन अधिक सेवा निवृत्त जवानांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती, त्यांना खास बोलावण्यात आले होते. या निमित्ताने प्रत्येक सेवा निवृत्त जवान किंवा त्यांच्या वीर पत्नींना इस्त्री भेट वस्तू म्हणून वितरण करण्यात येत होती. कार्यक्रम संपताच जवान सोडून इतर लोकांची भेट वस्तू घेण्यास झुंबड उडाली त्यात सीमेवर देशाचे संरक्षण करणारा जवान ताठ मानेने राहणाऱ्या वयस्कर जवानांची वाताहत झाल्याचा प्रकार देखील घडला आहे.
जवानांच्या व्यतिरिक्त उपस्थित इतर लोकांनीच इस्त्री भेट वस्तू घ्यायला सुरुवात करून गोंधळ उडाल्याने वितरण बंद करून भेट वस्तू गाड्या परत पाठवाव्या लागल्या आणि इस्त्री घरपोच करू असे माईक मधून अनाऊन्स करावं लागलं
त्या महिला नेत्याने त्यांना रिकाम्या हातीच परत पाठवले आहे.सेवा निवृत्त जवानांत मराठी भाषिक जवान अधिक होते व्यासपीठावर देखील दोनच मराठी नेते असल्याने काही प्रमाणात नाराजी होती.
केवळ मताच्या राजकारणासाठी आगामी निवडणुकीत ग्रामीण मतदारसंघातून निवडून येण्यासाठी काहींना जंग जंग पछाडले आहे त्यातूनच हा प्रकार घडला आहे.काही साड्या वाटतायेत काही भांडी तर काही लग्नात आहेर वाटप करताहेत.निवडणुकीच्या आचारसंहिते आधी सगळी आमिषे देऊन झाल्यावर निवडणुकीच्या काळात उजळ माथ्याने फिरायला मोकळे झाले असाच त्यांचा प्रयत्न आहे, मात्र आमिष दाखवून असा अपमान बरा नव्हे असे बोलले जात आहे.
आता मतदारांनी मी विकाऊ नाही, मी स्वतःला आणि माझ्या मताला विकणार नाही असेच ठोसपणे सांगण्याची वेळ आली आहे.