शहराच्या मध्यवर्ती भागात तयार होऊन नामकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या उड्डाणपुलाचे बारसं महा शिव रात्रीच्या निमिताने पार पडले. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते कपिलेश्वर उड्डाणपुल असे लिहलेल्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
मागील 8 दिवसा पूर्वी झालेल्या महा पालिकेच्या बैठकीत या उड्डाण पुलास ‘कपिलेश्वर उड्डाणपुल ‘ नावाचा ठराव पास करण्यात आला होता.त्यामुळे मंगळवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने फलकाचे अनावरण करण्यात आले.या प्रसंगी सत्ताधारी गटनेते पंढरी परब माजी महापौर सरिता पाटील किरण सायनाक नगरसेवक विनायक गूंजटकर रतन मासेकर विजय भोसले राजू बिर्जे नगरसेविका रेणु मूतकेकर ज्योती चोपडे सुधा भातकांडे मेघा हळदनकर माया कडोलकर आदी उपस्थित होते. दक्षिण भारतातील काशी म्हणून ख्यात असलेलं कपिलेश्वर मंदिराचा ऐतिहासिक संदर्भ असल्याने पालिकेत मागील बैठकीत ठराव मांडण्यात आला होता त्यानंतर लागलीच हा फलक उदघाटन करून औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.
कपिलेश्वर प्रसंगी मंदिर चे पुजारी महेश मूतकेकर प्रशांत भातकाडे विजय होनगेकर महेश लगाडे आदी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते