गीरे तो भी टांग उप्पर अशी एक हिंदीत म्हण आहे. असे हेकेखोर आणि त्यांचे पूजक सध्या म ए समितीतील एकीच्या प्रयत्नांना खो घालत आहेत. एकी करणाऱ्या तरुणांनाच शहाणपणा शिकवून आपला नेताच खरा असे म्हणणाऱ्यांना युवकांच्या टीकेचे धनी व्हावे लागते आहे.
सध्या जागृत युवक नेत्यांना एकत्र करण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नात उमेदवारी कुणाला द्यायची हे नंतर प्रथम एकी हे ब्रीद घेऊन तरुण काम करत आहेत. पण या प्रयत्नांना खीळ बसवण्याची कामे सुरू आहेत. स्वतःच्या उमेदवारीपेक्षा दुसरे काहीच मोठे नाही असे म्हणणार्यांचे चमचे या कामात आघाडीवर आहेत.
टीका होऊनही पुन्हा आपले तेच खरे हा हेकेखोर पणा सोडून दिला तरच समितीचा फायदा होऊ शकणार आहे.
एकूण काय फक्त आपणच मोठे म्हणण्याचा स्वार्थीपणा एकीत खीळ घालत असून त्याला आवर घालण्यासाठी युवकांना आणखी आव्हाने पेलावी लागणार आहेत.एकी करणारे युवक कोणत्या एका व्यक्ती किंवा मराठी वर्तमानपत्र स्पॉन्सर नसून त्यांची भावना समितीच्या अधिक जागा निवडून आणणें अशी आहे त्यामुळं व्यक्ती पूजक अंध भक्त कार्यकर्ते सोशल मीडियावर प्लांट केल्याचा फटका एकीच्या प्रक्रियेला होत आहे.