रेल्वेच्या गेट मन च्या दुर्लक्षा मुळे होणारा अपघात जागृत युवकांमुळे टळला आहे.घटना आहे अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटवरची सोमवारी सायंकाळची ….
वडगांव येथील युवराज चव्हाण पाटील आणि त्याच्या मित्राने प्रसंगावधान जागरूकता दाखवल्याने रेल्वे अपघात टळला आहे.सोमवारी सव्वा सहाच्या दरम्यान लोकमान्य टिळक एक्सप्रेस बेळगाव कडे येत असताना हा प्रकार घडला होता.
चौथ्या रेल्वे गेट जवळ एक्सप्रेस रेल्वे केवळ अर्धा की मी जवळ असताना हॉर्न वाजवत होती आणि गेट बंद नव्हता वाहतूक चालूच होती त्याच वेळी युवराज यांची नजर वेगाने येणाऱ्या ट्रेन आणि गेट बंद न करता दुसऱ्याच कामात व्यस्त असलेल्या गेट मन कडे गेली लागलीच त्यांनी गेट मन ला ओरडून फाटक बंद करायला लावले त्यानंतर रेल्वे तिथून पास झाली अन संभाव्य अपघात टळला.