येळ्ळूर हे महाराष्ट्र राज्य येळ्ळूर आहे कितीही फलक काढले तरीही महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हे वास्तव बदलणारे नाही ज्या प्रकारे येळ्ळूर संमेलनात लोक भेटत आहेत व्यक्त होत आहेत असे मत साम टी व्ही चे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ आयोजित १३ व्या येळ्ळूर येथील मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते .महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा एकत्र गुंफण्याची आज काळाची गरज आहे असे मत साम टी व्ही चे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले . जोतिबा फुले शिवाजी महाराज महाराष्ट्राला समजले नाहीत ते येळ्ळूर वासियांना उमगले. असेही संजय आवटे म्हणाले .
यावेळी बोलताना भाषा संस्कृती संगोपन करण्यासाठी संघटित प्रयत्न करणे गरजेचे आहे साहित्य निर्मितीतील उणिवेमुळे भाषेचे प्रभुत्व भाषा समृद्धी कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सकाळी महाराष्ट्र हायस्कुल पासून ग्रंथ दिंडी काढण्यात आली या दिंडीत लेझीमपथकासह विध्यार्थी शाहू फुले आंबेडकरांचा वास घेतेले फलक हाती घेत महिला वर्ग भजन वारकरी साहित्य प्रेमी सहभागी झाले होते . सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र शासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी भाषिक अल्पसंख्यांक कायद्या नुसार कर्नाटकने मराठी भाषिकांना सरकारी परी पत्रक मराठीत द्यावी तसेच सीमा भागातील मराठी संस्थांना महाराष्ट्र सरकारने अनुदान द्यावे असे ठराव येळ्ळूर संमेलनाचे परशराम मोटारचे यांनी मांडले . ऍड निशा शिवूरकर ,सुनील कुमार लवटे, अशोक देशपांडे यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला .