मेष-या सप्ताहात आपणास ग्रहांची शुभ परिणाम मिळतील काही महत्वाची कामे पूर्ण होण्यास काळ अनुकूल आहे.तसेच काही कोर्ट कचेरी संबंधित कामे मार्गी लागतील. परंतु काही कारणाने मन अशांत राहील.घरात किरकोळ वादाचे प्रसंग येतील.त्यामुळे डोके शांत ठेवून काम करावे.विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे लक्ष। द्यावे. काही भाग्य कारक गोष्टी घडून येतील.
वृषभ- या सप्ताहात आपणास समाधान कारक आर्थिक प्राप्ती होईल.घरातील वयस्कर व्यक्ती च्या तब्येतीची काळ जी घेतली पाहिजे.प्रवासाचे योग येतील.नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल. पूर्वी हाती घेतलेले काम या सप्ताहात पूर्ण होईल.या काळात वाहन जपून चालवावे.महिला वर्गाला काही मूल्यवान वस्तू च्या खरेदीचे योग येतील.
मिथुन-मागील सप्ताहापेक्षा हा सप्ताह मध्यम राहील.काही बाबतीत हा सप्ताह चांगला राहील.एखाद्या मंगलकार्यात भाग घ्याल खर्चाचे प्रमाण या सप्ताहात वाढेल त्यासाठी नकोते खर्च टाळावे.व्यावसायिक वर्गाला भागीदारा कडून लाभ होतील.या काळात आपणस शारीरिक त्रास जाणवतील.घरगुती वातावरण प्रसन्न राहील.
कर्क-हा सप्ताह आपणास शुभ फलदायी राहील विरोधकांचा विरोध मावळेल.तसेच विविध प्रकारच्या समस्या या काळात सुटतील.पैशाची चणचण मात्र जाणवेल.काही गोष्टीत संयम बाळगावा लागेल.सामाजिक कार्यात भाग घ्याल.नवीन योजना सुरू करण्यास काळ चांगला आहे.
सिंह-या सप्ताहात व्यावसाईक वर्गाने व्यवहार जपून करावे.कारण नुकसान होण्याची शक्यता आहे असे असले तरी आपण परिस्तिथीशी योग्य रित्या सामोरे जाण्यात यश येईल.या काळात पतिपत्नी वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या काळात शांत राहणे योग्य राहिल.विदयार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षात भाग घेण्यास संधी मिळेल.यासाठी प्रवास घडेल.काही गोष्टी वगळता हा सप्ताह बरा राहील.
कन्या-या सप्ताहाचा पूर्वार्धात कुटूंबात काहीतरी मंगलकार्य होण्याची शक्यता आहे.किंवा त्या संदर्भात काही बोलणी होतील.घरातील वातावरण प्रसन्न राहील.नोकरदार व व्यावसायिक यांना हा सप्ताह यश दायी राहील.प्रॉपर्टी चे व्यवहार यशस्वी होतील.वाहन चालवताना जपून चालवावे.एखाद्या मोहाला बळी पडू नये त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
तुला-या काळात आपण शांत राहणे योग्य राहील.कारण आपणास या काळात अनेक अडचणी येतील हाती घेतलेलेकाम लवकर पूर्ण होणार नाही.त्यामुळे निराश व्हाल.पैशाची चणचण जाणवेल परंतु आपण निराश होऊ नये पुढे ती कामे मार्गी लागतील.कुटूंबात वादाचे प्रसंग येतील.याकाळात मित्र मैत्रिणी मदत करतील.पोटाचे विकार या काळात जाणवतील विशेषतः वयस्कर व्यक्तींना.
वृश्चिक-या सप्ताहात प्रवासाचे योग येतील काही कामानिमित्त प्रवास करावा लागेल.या काळात कुणाचे मन दुखवले जाणार नाही याची काळजी घ्यावि.तसेंच घरातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.मुलांना मित्रांचे सहकार्य लाभेल. महिलांना धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल.तरुनतरुणींना प्रेमात यश मिळेल
धनू-यासप्ताहात आपण सामाजिक कार्यात भाग घ्याल.मानसन्मान मिळेल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल.मुलांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग येतील.याकाळात प्रकुर्ती ची काळजी घ्यावी.घरातील वातावरण आनंद दायी राहील.परंतु या काळात सरकारी कामे रेंगाळतील. काही आर्थिक लाभ होतील महिलांनी याकाळात बाहेर जातांना आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी.
मकर-हा सप्ताह आपणास मिश्र फल दायी राहील.गुडघेदुखी चे त्रास या काळात जाणवतील विवाह योग्य मुलां मुलीचे विवाह संबधी बोलणी सुरू होतील.नोकरीत असणाऱ्याना परदेशी जाण्याचे योग येतील या काळात खर्चाचे प्रमाण अधिक राहील.याकाळात विद्यार्थी वर्गातील मुलामुलींची प्रगती होईल.
कुंभ-याकाळात आपणाला काही अनअपेक्षित घटनांचा सामना करावा लागेल.त्यामुळे मन अस्वस्थ वाटू लागेल त्यामुळे या काळात धार्मिक गोष्टीकडे मन केंद्रित करा समस्या दूर करण्यासाठी बळ येईल आणि काही प्रमाणात त्या सुटतील .या काळात वडीलधाऱ्या चा सल्ला उपयोगी पडेल.या काळात आपण आपल्या कामात व्यस्त राहाल त्यामुळे कुटूंबाला वेळ देता येणार नाही.परंतु आताच संयम पुढे आपणास चांगले फल देईल.
मीन-हा सप्ताहात आपणास चांगला जाईल.मागे केलेल्या कष्टाचे चीज होईल.मानसन्मान मिळेल अडलेली कामे मार्गी लागतील.महिलांना कौटूंबिक सौख्य लाभेल उपवर मुलामुलींचे लग्न जमण्याचे योग येतील तसेच जुने मित्र भेतील.या काळात वाहन जपून चालवावे.तसेच या काळात नोकरीत असणाऱ्यांना बढती किंवा बदलीचे योग्य येतील.
ज्योतिष
उषा सुभेदार
कोरे गल्ली ,शहापूर,
बेळगाव, 8762655792