केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल हे अर्ध्या दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर येत आहेत अनेक कार्यक्रमात ते सहभाग दर्शवणार आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता खास विमानातून मुंबईहून बेळगावला येणार आहेत.
सकाळी साडे दहा वाजता रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करून रेल्वे स्थानकावर मोबईल तिकीट अप्प उद्घाटन करणार आहेत. सकाळी ११ ते साडे बाराच्या दरम्यान चेंबर ऑफ कॉमर्स पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्या नंतर सायंकाळी चार वाजता चिकोडी येथे रवाना होणार आहेत. चिकोडी येथील नियोजित कार्यक्रम आटोपून ते रात्री विजापूर ला रवाना होतील रविवारी दिवसभर विजापूर बिळगी येथील कार्यक्रम आटोपून रात्री पुन्हा बेळगाव हून दिल्लीला रवाना होणार आहेत.