Tuesday, January 21, 2025

/

जी आय टी प्राध्यापकांचे बॅडमिंटन मध्ये यश

 belgaum

गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापकांच्या महिला संघाने आंतराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे उप विजेतेपद पटकावले . बंगलोर येथे पीईएस युनिव्हर्सिटी येथे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . देशविदेशातील अनेक कॉलेजच्या बॅडमिंटन संघानी यात भाग घेतला होता .

git badminton

उपांत्य सामन्यात गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रा . अक्षता अंगडी आणि प्रा . सुप्रिया कुलकर्णी यांनी कोलंबो युनिव्हर्सीटीच्या संघाचा पराभव केला .अंतिम सामन्यात बंगलोरच्या एसजेबीआयटी संघाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला .
प्रा . अक्षता अंगडी आणि प्रा . सुप्रिया कुलकर्णी यांचा त्यांनी मिळवलेल्या उप विजेतेपदाबद्दल कॉलेजतर्फे त्यांचा कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय कालकुंद्रीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी प्राचार्य आनंद देशपांडे ,प्रा . आर . श्रीधर ,जिमखाना विभाग प्रमुख पी . व्ही . कडगडकाई ,क्रांती कुरणकर ,वाय . टी . कांबळे ,गजानन धर्मोजी आदी उपस्थित होते .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.