विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळीकडे विभागवार मेळावे होत असताना वडगाव जुने बेळगाव विभाग समितीच्या वतीनं जनजागृती साठी मेळावा आयोजित करण्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
वडगाव येथील नरवीर कार्यालयात बैठक झाली.अनेक युवक कार्यकर्त्यांनी विचार मांडले. वडगांव जुने बेळगाव भागातील प्रत्येक गल्लीतील दोन युवकांची समिती करून पुन्हा एक बैठक घेण्यात येणार आहे त्यावेळी मेळाव्याची तारीख ठिकाण पाहुणे ठरवले जाणार आहेत. या मेळाव्यात वडगांव जुने बेळगाव भागातील समितीच्या सर्व घटकांना सामील करून घेण्यात येणार असून शहर समितीच्या दोन्ही गटातील नेत्यांना आमंत्रण दिले जाणार आहे. वडगांव येथील मंगाई मंदिर किंवा जुने बेळगाव कलमेश्वर मंदिर येथे मेळावा आयोजित करण्याची शक्यता आहे.
शहर समितीचे दोन्ही गटातील नेते एकाच व्यासपीठावर आणण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.यावेळी नगरसेवक मनोहर हलगेकर,रतन मासेकर,दिनेश रावळ, कीर्ती कुमार कुलकर्णी, मनोहर होसुरकर,महेश जुवेकर आदी वडगाव जुने बेळगाव भागातील समिती नेते कार्यकर्ते उपस्थित होते.