बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट केली आहे.
येत्या १३ फेब्रुवारीला बेळगावात पासपोर्ट कार्यालय सुरू होईल असे त्यांचे मत आहे. हे नक्की होईल का? अजून सर्वकाही धूसर आहे.
बघू अंगडी साहेब पोस्ट खात्याला कामाला लावून यावेळी तरी काही ठोस करतात का? की यावेळीही नेहमी सारख्या घोषणाच देतात…..
दुसरीकडे कडोली साहित्य संमलेनाच्या निमित्ताने बेळगावला आलेले परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी आगामी तीन महिन्यात पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचे संकेत दिले होते त्यामुळे हे कार्यालय सुरु होण्याची शक्यताही नाकारता येत नाही