कर्नाटक सरकारने गनिमी काव्याने आरक्षण बदलून मराठी भाषिकांना महापौर पदापासून दूर ठेवण्याचे डावपेच आखले आहेत अश्या स्थितीत या टर्मच्या शेवटच्या बैठकीत नगरसेवकांनी सीमा प्रश्नाचा ठराव मांडावा असा ठराव मराठा मंदिर येथील युवकांच्या बैठकीत मांडण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी आगामी विधान सभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर एकीकरण समितीत एकी व्हावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत बहुतेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांना आवाहन करत महापौर संज्योत बांदेकर यांनी शेवटच्या बैठकीत ठराव मांडावा त्यामुळे सीमा प्रश्नाला बळकटी मिळेल अशी मागणी केली. येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्य राजू पावले, युवा मंच चे सुरज कंणबरकर श्रीकांत मांडेकर सह अनेक कार्यकर्त्यांनी मराठी नगरसेवकांच्या भूमिकेबद्दल विचार मांडत सुप्रीम कोर्टात सीमा प्रश्नी बळकटी मिळायला आगामी विधानसभा निवडणुकीत समितीला पूरक म्हणून हा ठराव मांडावा आणि आपली मराठी अस्मिता सिद्ध करावी असं आवाहन देखील केलं.
बैठकीच्या शेवटी मदन बामणे यांनी ठराव मांडला त्याला सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिल. समितीत सध्या इतर जाती धर्माचे लोक पूर्वी सारखे जाती धर्माचे लोक नाहीत केवळ मराठाच असल्याने इतर आरक्षण आल्यास मराठी भाषिका कडे सत्ता असून देखील अश्या समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे सर्व पगड जातींना समाविष्ट करून घेणे याच्या सह मुंबई महा पालिकेत सर्वात पहिले मुंबई गुजरातला जोडू नये असा ठराव झाला मग संयुक्त महाराष्टरचे आंदोलन झाले मग मुंबई महाराष्ट्राला मिळाली याची जाण बेळगावातील ३२ मराठी नगरसेवकांनी ठेवावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे .