टोमॅटोचे भाव होलसेल मार्केटमध्ये कमी दिले जात आहेत म्हणून तालुक्यातील केदनूर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
शेतकऱ्यांची निदर्शने गाजली कारण एक ट्रॉली लोड टोमॅटो घेऊन ते दाखल झाले होते. हे टोमॅटो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र पोलिसांनी त्यांना आडवले.
होलसेल मार्केट मध्ये १ रुपये किलो दर आहे, योग्य भाव मिळत नाही रिटेल मार्केट मध्ये २० रुपये किलो दराने विक्री केली जाते. उत्पादक शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे, प्रशासनाने होलसेल भाव ठरवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
लिंगराज पाटील, जयश्री सुर्यवंशी, गुरगौडा पाटील, रामलिंग काडपन्नावर, सीमा खोत, अखिला पठाण, एस के काकतकर यांनी नेतृत्व केले.