11 फेब्रुवारी रोजी येळ्ळूर येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी साम टी व्ही चे संजय आवटे यांची निवड झाली आहे.
येळ्ळूर येथील वतीनं येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ येळ्ळूर यांच्या वतीनं या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.
संजय आवटे यांचा परिचय खालील प्रमाणे
संजय श्रीधर आवटे
सध्या साम टीव्हीचे संपादक.
साम टीव्हीवर ‘आवाज महाराष्ट्राचा’ हा प्राइम टाइम शो होस्ट करतात.
भूतानमध्ये झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
यापूर्वी ‘लोकसत्ता’चे समूह सहसंपादक, मुंबई ‘सकाळ’चे संपादक, ‘कृषीवल’चे मुख्य संपादक, ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक, ‘लोकमत’चे निवासी संपादक, ऑनलाइन ‘लोकमत’चे मुख्य संपादक म्हणून काम केले.
शिक्षण-
B.Sc (Agri)
BCJ
MMCJ (Gold Medal)
M.A. (International Relations)
Dip in Dramatics
पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयातील SET परीक्षा पात्र.
अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदात सहभाग.
‘बराक ओबामा-बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड’ या पुस्तकाने खपाचे विक्रम मोडले.
‘पाकिस्तान-लष्करी सत्तेचे अर्थरंग’, ‘नियतीशी करार- नव्या जगाचे नवे आकलन’, ‘कला कल्पतरूंचे आरव’ अशा पुस्तकांचे लेखन.
‘कलात्म’ या कलेच्या सामाजिक आकलनाचा प्रयत्न करणा-या विशेष अंकांचे डॉ श्रीराम लागू यांच्यासोबत संपादन.