स्पेन मध्ये होणाऱ्या विश्व नृत्य स्पर्धेस बेळगावातील डान्सर पात्र ठरले आहेत.बेळगावातील एम स्टाईल नृत्य अकादमी चे डान्सर सीटगेस बार्सिलोना स्पेन येथे होणाऱ्या 2018 नृत्य स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
बेळगावातील तरुण युवक आपल्या नृत्याची चमक या स्पर्धेत दाखवणार आहेत.फिनिक्स मार्केट बंगळुरू मध्ये झालेल्या पात्रता फेरीत यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या 300 हुन अधिक डान्सर मधून त्यांनी दाखवलेल्या नृत्यातून या बेळगावच्या डांसरांची निवड झाली आहे.
सेजल पाटील,प्रार्थना ग्रोवे,प्रेरणा गोनबरे,अनुशा बेनकट्टी, या एम स्टाईल अकादमीच्या नृत्यांगनाची निवड झाली आहे.22जून ते 1 जुलै 2018 पर्यंत स्पेन मध्ये होणाऱ्या विश्व स्पर्धेतआपलं टॅलेंट दाखवणार आहेत.या शिवाय पार्थ आणि रोशनी या दोघांची देखील राखीव म्हणून निवड झाली आहे.
सेजल पाटील-राष्ट्रीय स्तर फोक चिल्डन सोलो
प्रार्थना ग्रोवे-हिप होप सोलो
प्रेरणा गोनबरे-शो डान्स
अनुशा बेनकट्टी- शो डान्स
या मुलांना महेश जाधव हे गेल्या तीन वर्षांपासून ट्रेनिंग देत आहेत दररोज त्यांच्या कडून डान्स सराव करून घेत आलेत .गेल्या 9 वर्षा पासून जाधव हे मुलाना नृत्य शिकवतात.
“माझ्या साठी ही स्वप्न पूर्तीच आहेमाझें विद्यार्थी विश्व कप साठी पात्र झाले आहेत त्यांच्या टॅलेंट वर त्यांनी हे यश मिळवलंय ते नक्कीच विजयी होतील यासाठी शुभेच्छा” जाधव यांनी बेळगाव live कडे बोलताना दिल्या आहेत.