गेल्या काही दिवसा पूर्वी गोव्याचे जल संपदा मंत्र्यांकडून कणकुंबी येथील कळसा भांडुरा नाल्याची पहाणी केल्यावर रविवारी गोवा विधानसभेचे स्पीकर डॉ प्रमोद सावंत यांनी कळसा नाल्यास भेट देऊन पाहणी केली.
या शिष्टमंडळात उप सभापती रोद्रीग्ज, सह दोन आमदार आणि आजी माजी लोक प्रतिनिधी सहभागी झाले होते.कळसा नाल्याची पाहणी करणाऱ्या शिष्टमंडळाने बेळगाव जिल्हा प्रशासनास पाहणी करणार असल्याची पूर्व कल्पना न देताच पाहणी केल्याचे वृत्त कन्नड न्यूज वेब साईट नी चालवले होते.
पुढच्या महिन्याच्या 6 फेब्रुवरीस म्हादाई पाणी वाटपा बद्दल सुनावणी होणार आहे.कर्नाटक सरकार स्टेटस को मेंटेन करत आहे की नाही याची पहाणी गोव्याच्या शिष्टमंडळाने केली आहे.