कॉम्रेड अण्णाभाऊ साठे संमेलनात जे झालं नव्हतं तो योग येळ्ळूर समितीच्या वतीने आयोजित सीमा सत्याग्रहाच्या सत्कार कार्यक्रमात जुळून आला.मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी तालुका समिती नेते माजी आमदार मनोहर किणेकर आणि सीमा भागाचे नेते शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर हे एकाच व्यासपीठावर आले आहेत.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही समितीतील नेते एकाच व्यासपीठावर आल्याने सीमा लढ्याचा केंद्र बिंदू असलेल्या येळ्ळूर गावात जे पिकतय ते सीमा भागात उगवतंय अस म्हणतात तेच पुढे येईल का हाच महत्वाचा प्रश्न आहे. येळ्ळूर समिती च्या वतीने सीमा सत्याग्रहींचा सत्कार कार्यक्रम हेच एकीची नांदी ठरावी अशो अपेक्षा आहे
या कार्यक्रमात माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहल्ली, अड राम आपटे, किसनराव येळ्ळूरकर,दिनेश ओउळकर मालोजी अष्टेकर आदी उपस्थित होते.