आर्थिक चळवळ बेळगावात कधी सुरू झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ही माहिती हातात आली आहे.
१८६७ मध्ये प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे ने आपली बेळगाव शाखा सुरू केली होती,पायोनियर को ऑप अरबन बँकेची स्थापना १९०६ मध्ये झाली होती तिचे अर्बन क्रेडिट बँकेत १९२१-२२ मध्ये रूपांतरण करण्यात आले. त्यानंतर १९३० पर्यंत बेळगाव मध्ये एकच बँक होती, १९३० मध्ये दी बेळगाव बँक लिमिटेड सुरू करण्यात आली. लगेचच १९३१ मध्ये सांगली बँक लिमिटेड, १९३४ मध्ये सिंडिकेट बँक सुरू झाली, ही या बँकेची देशभरातील बारावी शाखा होती.
१९३७ मध्ये दी बँक ऑफ सिटीझन कॉर्पोशन बँकेत विलीन झाली, दि न्यु सिटीझन बँक सुद्धा याचकाळात बँक ऑफ बरोडा मध्ये विलीन झाली.
१९३८ मध्ये कॅनरा बँकेची स्थापना झाली, १९४५ मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि १९४६ मध्ये सध्या स्टेट बँक म्हणून ओळखली जाणारी इंपेरीयल बँक ऑफ इंडिया सुरू झाली.
१९४७ मध्ये बँक ऑफ कर्नाटक हुबळी बँक ऑफ कर्नाटक मध्ये विलीन करण्यात आली. मिरज स्टेट बँक लिमिटेड युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन करण्यात आली.१९५६ व १९५८ च्या काळात बँक ऑफ महाराष्ट्र व कुरुंदवाडची गणेश बँक बेळगावात दाखल झाल्या. १९५७ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात १३ ठिकाणी ३७ बँक शाखा कार्यरत होत्या.१९५६ मध्ये दी सुप्रीम बँक ऑफ इंडिया बंद झाली,
१९७२ मध्ये इंपिरियल बँकेने आपले पे ऑफिस सुरू केले, तर युनियन बँकेत १९७५ मध्ये बेळगाव बँक विलीन करण्यात आली.
माहिती: कर्नाटक गॅझेट