Monday, November 18, 2024

/

गंभीर प्रकार होऊनही इच्छुक व नेते शांतच!

 belgaum

कन्नड गीत गाऊन सीमावासीयांच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रकार सीमाभागाचे प्रभारी चंद्रकांत पाटील यांनी केला असतानाही समितीचे नेते आणि येत्या विधानसभेचे इच्छूक अध्याप शांतच आहेत, त्यांच्या मौनीबाबा बनण्याचे कारण नेमके काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Kop mes arrest
चंद्रकांत दादा यांनी गोंधळ घातल्यानंतर युवावर्ग आणि समितीतील नवीन पिढीने जोरदार निषेध केला, थेट माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व युवा मंच सारख्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात जाऊन निदर्शने केली, पण ना मध्यवर्ती ना कुठली घटक समिती, ना नेते, ना आमदार, ना पुढील निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले हेकेखोर इच्छूक यांनी तोंडातून शब्दही काढला, म्हणजे बाका प्रसंग आला की गप्प बसून फक्त संधीसाधुपणा करायचा आहे काय? असा प्रश्न निर्माण होतोय.
समितीने या घटनेचा जितक्या तीव्रपणे निषेध करायला पाहिजे तितका झाला नाही. मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी काहीच निषेध केला नाही, एकटे मालोजी अष्टेकर वगळता बाकीचे कुठे पळून गेले? समितीच्या जीवावर आमदार, नगरसेवक, जि प सदस्य, ता प सदस्य झालेल्यांची ही जबाबदारी नाही का? हा प्रश्न सीमावासीय जनता विचारत आहे.
हे सगळे त्या दादाला मॅनेज झाले की त्याचे लांगुलचालन करून मी तेंव्हा तुम्हाला काय बोललो नव्हतो हे दाखवायचे आहे…?
उत्तर द्यायलाच लागेल

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.