३ वर्षे ४ महिने बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सेवा बजावीत असताना पोलीस व अधिकार्यांच्या सहकार्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लागला नाही. खून, दरोडे आणि चोरीची प्रकरणे नियंत्रणात आणण्यात मी यशस्वी ठरलो असल्याचे मावळते जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बी.आर. रविकांतेगौडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंगळूरचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून माझी बदली झाली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूपच कमी झाले होते. धाडसाने पोलीस सेवा कशी बजवावी हे मी बेळगाव येथे अनुभविले असल्याचे ते म्हणाले.
गतवर्षी प्रायोगिक तत्वावर मी तयार केलेल्या ’पोलीस बीट व्यवस्था’ या संदर्भात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी कौतुक केले. या बीट व्यवस्थेचे अन्य जिल्ह्यांनी अनुकरण करावे अशा सूचना दिल्याची त्यांनी आठवण करुन दिली.
पथसंचलन व कवायतमध्ये असलेल्या हिंदी शब्दांचे रुपांतर कन्नडमध्ये केले गेल्याने बेळगाव येथूनच मला प्रेरणा मिळाली असे त्यांनी सांगितले. सुधारीत गस्त व्यवस्थेमुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये असलेले अंतर कधी होण्यास मदत झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.