सीमावासीयांनाच अटक करण्याचा शूरवीरपणा केवळ सरकारी आदेशामुळे दाखवायला लागलेल्या कोल्हापूर पोलिसांनी अखेर आंदोलकांची सुटका केली आहे, सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय कळवू असे सांगण्यात आले आहे.
आंदोलन हा सीमावासीय जनतेचा पिंड आहे, यामुळे बेळगावची माणसे मागे पडत नाहीत, संघर्ष कर्नाटकाशी सुरू असताना महाराष्ट्रातही तशीच वागणूक मिळाली की असून बसतात, याचे प्रत्यन्तर कोल्हापूरच्या पोलिसांनाही आले आहे, यामुळे बंदोबस्तात कोल्हापूरच्या सीमेपर्यंत पाठवणी करण्यात आली आहे.
आता दादाची माफी, समन्वयक पदावरून हटाव आणि नवा सीमावासीयांची जाण बाळगणारा नेता द्या ही मागणी कायम राहील, या मागणीची पूर्तता महाराष्ट्रातील सरकार किती तत्परतेने करते यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकार आणि दादांचे कन्नड गायन याची गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे, हवे तर दादांना कर्नाटकातल्या एखाद्या कन्नड ऑर्केस्ट्रात घाला, पण सीमावासीयांना कर्नाटकात जन्म भाग्यवान हे सांगण्यासाठी पाठवू नका, अशी मागणी केली जात आहे.