महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कोल्हापूरच पालक मंत्री आणि सीमाभागाच्या प्रभारी पदाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय आपल्या फेसबुक पेज वरून जाहीर करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, मेडिकल साठी महाराष्ट्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सीमाभागातील विध्यार्थ्यांना महाराष्ट्राचे रहिवासी असा दर्जा देण्याचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, पण नाराज मंडळींनी तेथेच कॉमेंट करून दादांना “बुंद से गयी ओ हौद से नही आती ” असा जवाब दिला आहे.
सीमाभागातील मराठी भाषीक विद्यार्थ्यांची मोठी अडचण राज्य शासनाने दूर केली आहे. सीमाभागातील जे विद्यार्थी महाराष्ट्रातल्या मेडिकल, BDS, BMS साठी अर्ज करू इच्छित होते त्यांना MBBS साठी 8, BDS साठी 2 BAMS साठी 5 राखीव कोटा आहे ,परंतु त्यांना महाराष्ट्राच्या कोट्यामधून पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अर्ज करताना रहिवासी दाखल्याची अडचण यायची, मात्र आता हि अडचण येणार नाही. त्यांना महाराष्ट्राचे रहिवासी मानून पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अर्ज करता येईल.
अशी पोस्ट दादांनी घातली होती, पण एकीकडे त्यांचे कन्नड गीत गाजत असल्याने दादांना या पोस्ट चा जास्त फायदा होऊ शकला नाही, उलट दादा सल्लागार बदला असेही त्यांना ऐकून घ्यावे लागत आहे.