कन्नड अस्मितेच्या गीतातून जन्म घ्यावा तर कर्नाटकातच असे चंद्रकांत दादा पाटील सांगत असतील तर त्यांनी खुशाल कर्नाटकात जन्म घ्यावा त्याला बेळगावातल्या मराठी भाषिकांची कसलीही हरकत नाही. पण आम्ही आमचे वाड वडील महाराष्ट्रातच जन्मलो आहोत भलेही भाषावार प्रांत रचनेत आम्हाला घुसडले असले तरी आम्ही आजही स्वताला महाराष्ट्राचेच समजतो अशी प्रतिक्रिया मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी दिली आहे.
दादा पाटलांची महाराष्ट्र शासनाने समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे दादांनी मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन पंत प्रधानाकडे जाव आणि सीमा प्रश्न सोडवून घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांशी किती चर्चा केल्या किती भेटी बेळगावला दिल्या. मुख्यमंत्री पंत प्रधान ,जेष्ठ विधी तज्ञ आणिकेंद्रीय गृह मंत्र्यांशी कधी चर्चा केली काय ? असा प्रश्न देखील अष्टेकर यांनी विचारला आहे.