कर्नाटकाचे गोडवे गाऊन सीमा वासीयांच्या जखमेवर मोठ चोळणारे बेळगावचे समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आणखीन एक जावई शोध लावला असून ते कन्नड मधील गाण म्हणजे दुर्गा स्तुती च्या ओळी आहेत अस म्हणून सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला आहे यावरुन एवढ वातावरण करण्याचे कारणच नाही अशी उडवा उडवीची प्रतिक्रिया देखील दादा पाटील यांनी दिली आहे.
माझ्या घरात लहान मोठा झालेल्या यल्लाप्पाच्या गावी दुर्गा मंदिराचा वास्तू कार्यक्रम होता त्या निमित्ताने आपण बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील तवद गावी गेलो होतो तिथ झालेल्या कार्यक्रमात बहुसंख्य हे कन्नड भाषिक होते त्यामुळे आपण कन्नड भाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हिंदी तून बोललो विकास कामावर १५ मिनिटे बोललो त्याच काही नाही का ? देशाला आपण कुठे घेऊन चाललो आहोत असा संतप्त सवाल देखील त्यांनी केला आहे.बेळगाव live ला मुुलाखातीत त्यांनी वरील माहिती दिली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीशी आपण कायम संपर्कात असून सर्वोच्य न्यायालयाच्या कामकाजापासून ते सीमा प्रश्नी आपल्या बैठका गाठीभेटी कायम समिती नेते आणि मराठी भाषका बरोबर होत असतातअसेही त्यांनी सांगितले. कन्नड गाण्यामुळे मराठी भाषिकांची मन दुखावली त्यामुळे समन्वयक पद वरून बेळगावातून हकालपट्टीची होत असलेल्या मागणी बद्दल त्यांनी बोलण्यास काहीच नकार दिल्याचे स्पष्ट केल.
‘हुट्टीदरे कन्नड नाडल्ली हुट्टबेकू’ या गाण्यातच कन्नड सुपरस्टार कै डॉ राज कुमार यांनी हातात लाल पिवळा ध्वज घेऊन गाण म्हटल होत हे गाण इतक लोकप्रिय बनल आहे की त्याच गाण्यात हातात घेतेलला लाल पिवळा ध्वज हा कर्नाटकच्या अधिकृत ध्वज म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या केंद्र सरकारकडे मागणी करणार आहेत. मात्र चंद्रकांत दादा या गाण्याच्या ओळींना दुर्गा स्तुती म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत.एवढ सगळ होत असताना दिलगिरी व्यक्त करून विषयावर पडदा टाकता आला असता मात्र चंद्रकांत दादांच्या मनात ऐन विधान सभेच्या तोंडावर चाललंय तरी काय असा प्रश्न देखील सीमावासीय उपस्थित करताना दिसत आहेत.
दादा उत्तर ध्या
बेळगाव live देखील दादा पाटील यांना प्रश्न विचारात आहे? एकीकरण समितीने तुम्हाला किती वेळा बेळगावला यायची आमंत्रण दिलीत तुम्हा का बेळगावात येऊन मराठी जणांच्या समस्या जाणून घेतला?का येळ्ळूर मारहाणी मधल्या मराठी जणांना अजूनही कॉंग्रेस राष्ट्रवादीनी जाहीर केलेली आर्थिक मदत दिला नाही?आघाडी सरकारच्या काळात बेळगावातील मराठी संस्था साहित्य संमलेनाना मिळत असणारी आर्थिक मदत का बंद केला?