केवळ राजकीय स्वार्थासाठी सीमा वासीयांच्या जखमेवर मीठ चोळणे दादांना शोभा देणार नाही.सीमा प्रश्न सुटे पर्यंत बेळगावात राष्ट्रीय पक्षाचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेण्या एवजी बेळगावात जाऊन मराठी विरोधी भूमिका घेण हे दुर्दैव आहे अश्या शब्दात मराठी युवा मंच ने निषेध केला आहे.
समन्वयक मंत्री पदी निवड झाली असली तरी एकदाही बेळगावला आले नाहीत कधी सीमा वासीयांच्या व्यथा जाणून घेतल्या नाहीत आशय स्थितीत केवळ महारष्ट्र एकीकरण समितीच एकट्या जीवावर कर्नाटक सरकारशी मुकाबला करत आहे. सीमा वासीयांच्या लढ्यात आंदोलनाला बोलावलं तरी यायचं नाही आणि कर्नाटकातील भाजप कॉंग्रेस नेत्यांच्या हाकेला होकार देत गोकाक सारखा कार्यक्रमला हजेरी लावायची ही चंद्रकांत दादांची दुटप्पी भूमिका आहे.सीमा वासीयांची जाण असलेल्या व्यक्तीलाच सीमा प्रश्न समन्वयक मंत्री नियुक्ती करावी अशी मागणी देखील युवा मंच ने केली आहे.नारायण किटवाडकर,सुरज कणबरकर अजित कोकणे किरण मोद्गेकर सुधीर कालकुंद्रीकर यांनी पत्रक काढल आहे.