गोकाक मध्ये जाऊन कन्नड प्रेम दाखवणाऱ्या सीमा भागाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. गोकाक मध्ये मराठी द्वेष्ट्यांच्या सहवासात जाऊन दादांनी केलेलं वक्तव्य संतापजनक आहे मराठी जणांच्या भावनावर मीठ चोळणारे आहे. दादांनी हे गीत गायल्यामुळे महाराष्ट्र सीमा प्रश्ना बाबत किती गांभीर्य आहे हे कळून चुकल आहे असा निषेध पत्रक युवकांनी काढले आहे.
दादांची समन्वयक मंत्री पदा वरून हकालपट्टी करून रक्तात मराठी अस्मिता असणारी राजकारण विरहीत व्यक्ती समन्वयक म्हणून नेमावी अशी मागणी करत भाजपाचे मराठी प्रेम किती बेगडी आहे हे देखील स्पष्ट झाले असून याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. पत्रकावर मेघन लंगरकांडे,दैविक हळदणकर,संतोष कणेरी,सतीश गावडोजी,चेतन जुटेकर,अमित हळदणकर,विनायक बावडेकर,सुधीर कालकुंद्रीकर,राजू पाटील ,विठ्ठल हणमशेट,वैभव कुट्रे,शुभम जुवेकर,ओमकार मेंडके आदीच्या पत्रकारावर सह्या आहेत