Friday, January 31, 2025

/

 चंद्रकांत दादा आम्ही कर्नाटकात जन्मलो नाही

 belgaum

सीमा प्रश्नाचे प्रभारी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक  मधील मंदिराच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहून “जन्मले तर कर्नाटक मध्येच जन्मांवे”(हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकु) अस गाणं म्हणून उपस्थितांना खुश करण्याचा प्रयत्न केला.

गोकाकच्या तवग गावातील  दुर्गादेवी मंदिर उदघाटन  कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी दादांनी वेळ काढला पण सीमाप्रश्नासाठी समिती नेत्यांची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला चालना देण्यासाठी बेळगावला यायला वेळ काढला नाही.कार्यक्रमाला बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी देखील उपस्थित होते.Dada patilएकीकडे गेली 61 वर्षी बेळगावात सीमावाद असला तरी कन्नड मराठी भाषिक एकीनेच रहातच आहेत, अशात भाषाभेद कसला करता सीमा वाद असला तरी एकीने सौहार्दाने राहावं असा सल्ला देणाऱ्या दादांनी आपण  सीमा प्रश्नाचे प्रभारी मंत्री आहोत याचे भान ठेवायला हवे होते.
सध्या कर्नाटकात विधानसभेच्या तोंडावर भाजपची जाहिरातबाजी करण्यासाठी चंद्रकांत दादांनी कन्नड अभिनेता राजकुमारचे गीत आळवले पण सीमाभागात याच कन्नड लाठ्या खाऊन मराठीजन विव्हळत आहेत याची जाण त्यांना राहिली नाही.
भाजपने केवळ राजकीय स्वार्थ पाहू नये, मराठीचा विचार करावा अन्यथा सिमावासीय भडकला तर महाराष्ट्रात विधानसभा महागात पडेल, असा इशारा सिमावासीय देत आहेत.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.