शहरात दुचाकी पळवणाऱ्या आणि चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश मार्केट पोलिसांनी केला असून सात जणांना अटक करून त्यांच्या जवळील ९ दुचाकी वाहन आणि २१ मोबईल फोन जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अबुसलाम पाचापुरी,गुरु शिवबसय्या हिरेमठ, पुंडलिक मदन सूर्यवंशी,खादर अब्दुल रशीद मालदार,मोहम्मद शेख उबेद शेख,परशराम शिवलिंग गोधी अशी या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.९ दुचाकी वाहन विविध कंपन्याचे २१ मोबाईल यांच्या कडून जप्त करण्यात आले आहेत. ए सी पी शंकर मारिहाळ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एस प्रशांत यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त डी सी राजप्पा उपायुक्त सीमा लाटकर यांनी तपास करून दुचाकी चोरांना पकडलेल्या पोलिसांच अभिनंदन केल आहे