Saturday, December 21, 2024

/

घरात झगडले आणि पोस्ट मार्टम वेळी एकत्र आले

 belgaum

मूळचे विजापूर जिल्ह्यातील बेळगावला मजुरी करायला आलेल्या एका जोडप्याने वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्त्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील अलतगा गावात घडली आहे.
विजापूर येथील सिंदगी तालुक्यातील यलगोड गावातील आणि सध्या अलतगा येथील एका फॅक्टरीत काम करणाऱ्या अंजली रवी राठोड 21,रवी रामचंद्र राठोड 25, या दोघांनी आत्महत्या केली आहे.
काकती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलतगा येथे राहणाऱ्या दोघा दाम्पत्याचे क्षुल्लक कारणा वरून भांडण झाले होते त्या नंतर गळफास लावून घेऊन अंजली हिने आत्महत्त्या करून घेतली होती पत्नी ने गळफास लावून घेतलेलं पाहून रवी घर सोडून बेपत्ता झाला होता पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मयत महिलेचं शव बिम्स येथील शवगारात ठेवले होते.
पोस्ट मार्टम संपवताच अलतगा येथे पोलिसांना शेतात झाडाला गळफास लावून घेतलेलं दुसरं शव आढळलं ते तिचाच पती रवी राठोड याचं होतं, त्याचं शव देखील पोलिसांनी पोस्ट मार्टम केलं.
घरी एकत्रित भांडण केलेले पती पत्नी शेवटी मयत झाल्यावर मरणोत्तर शवगारात एकत्रित आले अशी चर्चा इथे सुरू होती. जीवन छोटं आहे ते न भांडता जगणे गरजेचे आहे नाहीतर शेवट वाईट आहे हे समजून घेतले नाही तर काय घडते हेच या घटनेत दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.