विध्यार्थ्यांना लष्करात सेवा बजावण्याची भावना तयार करण्यासाठी देशभक्तीची भावना तयार करण्यासाठी मराठा सेंटरच्या वतीने शालेय विद्यार्थ्या साठी विशेष उपक्रम राबवण्यात आला होता . केंद्रीय विद्यालय स्कुल २ .कॅटोन्मेंट स्कुल, सेंट जोसेफ आणिआंबोली सैनिक स्कुल तसेच राष्ट्रीय मिलिटरी स्कुलच्या च्या ६२० विध्यार्थ्यानी या मोहिमेत सहभाग नोंदवला होता.
सैन्यदलात भर्ती होण्याची विविध संधी आहे असे यावेळी विध्यार्थ्यांना पटवून सांगण्यात आले मराठा सेंटरच्या अधिकारी आणि जवानांनी यावेळी प्रात्यक्षिके देखील दाखवली २० जानेवारीला होणाऱ्या पासिंग आऊट परेड ची रियसल पाहणायची संधी देखील शालेय मुलांना पाहायला मिळाली अधिकाऱ्यांनी यावेळी मराठा सेंटरचा जाज्वल इतिहास समजावून सांगितला