गुरुवारी सायंकाळी गोगटे रंग मंदिरात बॅनर्जी नाथ पै व्याख्यान मालेस सुरुवात झाली यावेळी पुणे येथील जेष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालयाचा 2017 चा उत्कृष्ट पत्रकार मराठी विभागातबेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांना प्रदान करण्यात आला.कन्नड विभागात केशव आदी प्रतिनिधी उदयवानी,नसीम सनदी प्रतिनिधी पुढारी कोल्हापूर(मराठी गट महिला),सुनीता देसाई कार्यक्रम संयोजिका वेणूध्वनी(कन्नड गट महिला) यांना महिला यांना वितरित करण्यात आला.व्याख्यान मालेच्या पहिल्या दिवशी कुमार सप्तर्षी यांनी तब्बल दोन तास महात्मा गांधीजी समजावून सांगितला.याावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अनंंत लाड,नेेताजी जाधव, अनंत जागळें,सुनीता मोहीते उपस्थित होते.सार्वजनिक वाचनालयाचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून मिळालेला पुरस्कार म्हणजे सोशल मीडियाची घेतलेली दखल आहे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबत फास्ट असलेल्या सोशल मीडियाची देखील दखल घेतली जात आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून बेळगाव live ने केवळ 11 महिन्याच्या काळातच वेब न्यूज लोकप्रिय बनवलं आहे त्याचीच पोचपावती वाचनालय पुरस्काराने झाली.बेळगावात मराठीं मीडियात सोशल मिडियाचा ट्रेण्ड उभं करण्याचं श्रेय बेळगाव live ला जात हे देखील शिक्कामोर्तब झाल आहे.