शहरात ठीक ठिकाणी कार पेटवून धुमाकूळ घालणारा दुसरा तिसरा कोणी नसून एक विकृत डॉकटर असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी त्याला अटक केली आहे. डॉ अमित गायकवाड (मूळचा गुलबर्गा) असे त्याचे नाव असून तो सरकारी वैधकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे.
त्याला कार पेटवण्याची विकृती आहे. गुलबर्गा येथेही त्याने पूर्वी असे प्रकार केले आहेत.
बुधवारी रात्री त्याला डिसी कम्पाउड जवळ रंगेहात पकडण्यात आले, मध्यरात्री त्याच्या घराचीही पाहणी पोलिसांनी केली आहे. एपीएमसी चे सीपीआय जे एम कालिमिर्ची यांनी ही कारवाई केली आहे.
Trending Now