सीमाप्रश्नाच्या मागणीसह मराठा क्रांती मोर्चा यासाठी आणि सुप्रीम कोर्टाचा दाव्यात फालोअप असू देत किंवा समितीचा महा मेळावा असुदेत या कामात अग्रभागी असणारं एक नेतृत्व म्हणून मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्याकडे पाहिलं जाते.
मरगाळे आणि सीमा प्रश्नाचं नातं अतुट आहे कारण तश्या घटना देखील त्यांच्या घरा बाबत घडल्या आहेत त्यांचे वडील १९७८ साली ३१ ऑक्टोंबर रोजी रात्री निधन पावले होते, दुसऱ्या दिवशी एक नोव्हेंबर मराठी भाषकांचा काळा दिवस सुतक दिन म्हणून रात्री बाराच्या आतच अंतिम संस्कार करण्यात आला मात्र त्याच दिवशी रात्री बारा वाजता त्यांच्या घरी कन्या जन्माला आली तेंव्हा पासून ते आता पर्यंत १ नोव्हेंबर ला जन्म्लेली मुलगी सिमा प्रश्नी सुतक दिनी जन्मली म्हणून आपला वाढ दिवस साजरा करत नाही
या वर्षी त्यांची आई लक्ष्मी बाई मरगाळे यांचा १७ जानेवारी हुतात्मा दिनीच मृत्यू झाला, हा योगायोग आहे तसच जन्म किंवा मृत्यु कुणाच्या हातात नसतो मात्र समितीच्या काळा दिन आणि हुतात्मा दिनीच त्यांचा घरी अश्या घटना घडल्या आहेत त्यामुळे मरगाळे अन सीमाप्रश्न हे नातं अतुट आहे असच म्हणावं लागेल.
पत्रकार म्हणून आम्ही मरगाळे यांना भेटतो तेंव्हा पोट तीडिकीने सांगत असतात, हरीश साळवे, आमची केस आणि प्रश्न एवढच बोलत असतात आमदारकी निवडणुकाना जास्त महत्व देत नाहीत असे अनेक कार्यकर्ते बेळगावात आहेत म्हणून सीमा प्रश्न जिवंत आहे.