हेल्मेट सक्तीचा निर्णय फार आधी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी करणार, असे सांगून येत्या २६ जानेवारी पर्यंत जागृती करून हेल्मेट न वापरणाऱ्या व्यक्तीकडून दंड घेतला जाईल, अशी माहिती आयजीपी अलोककुमार यानी पत्रकारपरिषदेत दिली. सुप्रीम कोर्टाच्या नियम नुसार आय एस आय दर्जाचे हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असेल पोलिसांना दाखवण्याची नाही तर स्वतःचा जीव वाचवण्या साठी हेल्मेट परिधान करा असं आवाहन देखील कुमार यांनी यावेळी केलं .
आगामी विधानसभा निवडणूक काळात राउडी शिटर ची यादी बनवून त्यांच्यावरील शिल्लक राहिलेल्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या जातील, मटका, जुगार, सावकारी करणारे आणि गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिसांना दिले आहेत, त्यांनी कारवाई न केल्यास गय करणार नाही. असेही त्यांनी सुनावले.
निवडणूक काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना भडकावून दंगली करणाऱ्यावर नजर ठेवणार असून अश्यावर कारवाई साठी पोलीस दक्ष असणार आहेत .निवडणुकी पूर्वी आंतर राज्य माहिती संयुक्त सभा घेणे आंतर राज्य सीमे वर चेक पोस्ट बसवणे बेकायदेशीर दारू विक्रीवर आळा घालणे , रेंज मधील शहरातून व्यवस्थित पार्किंग व्यवस्था करून घेणे जनसंपर्क वाढवणे आदी काम पोलीस हाती घेणार असल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेवेळी बेळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख रवींद्र गडादी देखील उपस्थित होते
Trending Now